Posts

Showing posts from August, 2017

माज्या पत्रिकेतील "पितृदोष"

माज्या पत्रिकेतील "पितृदोष" https://PankajSGaikwad.blogspot.com अभियांत्रिकीच्या वापरलेल्या वह्यांची रद्दी चाळत असताना मला त्यात एक ज्योतिषाने पितृदोषाच्या शांती साठी लागणाऱ्या वस्तूंच्या यादीचा कागद सापडला आणि मी लगेचच पाच वर्षांपूर्वीच्या भूतकाळात शिरलो. अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षाचा निकाल लागला, ते वर्ष होत २०१२. मी खूप मेहनत करून अभ्यास केला होता त्यामुळे पास(!) होण्याची निश्चितच खात्री होती. निकाल लागला! आणि खरंच माझा निकाल लागला व ४ विषयांसोबत मी नापास झालो. अभियांत्रिकीला नापास होणे म्हणजे काही विशेष गोष्ट नसते परंतु अभ्यास करून जर नापास झालात तर ती फारचं वेदनादायक गोष्ट असते हे कोणताही अभियंता सांगू शकेल. खरं वाईट तेव्हाच वाटत की जेव्हा तुम्ही सर्व मित्रमंडळी एकत्र अभ्यास करून तुमचे सर्व मित्र उत्तीर्ण होतात आणि फक्त तुम्ही एकटे नापास होतात, खरंच फारच वेदनादायी असतं! त्यानंतर आलेले अनुभव हा माज्या आयुष्यातील सुवर्णकाळ मानतो मी. आपले मित्र आपल्याला कसा सल्ला देतात सहकार्य करतात त्यातून आपण कसे शिकत जातो हे महत्त्वाचं. असंच नापास का झालो म्हणून दिवसभर चिंतन क

आधुनिक द्रोणाचार्य आणि एकलव्य

महाभारताच्या काव्या मध्ये एकलव्य आणि द्रोणाचार्य यांची कथा प्रसिद्ध आहे. त्या कथेमध्ये द्रोणाचार्यांनी एकलव्याला शिष्य म्हणून स्वीकारलं नाही तरी सुद्धा त्याने द्रोणाचार्यांची मूर्ती बनवून त्या मूर्तीला गुरूस्थानी मानून सराव करत धनुर्विद्या अवगत केली आणि तो याबाबत द्रोणाचार्यांचा लाडका शिष्य अर्जुना पेक्षा सुद्धा सरस ठरला. द्रोणाचार्यांना हे समजताच त्यांचा अहंकार दुखावला जाऊन त्यांनी गुरुदक्षिणा म्हणून एकलव्याला उजव्या हाताचा अंगठा म्हणजेच त्याची धनुर्विद्या नष्ट करण्याची दक्षिणा मागितली. तरी सुद्धा एकलव्याने कसलाही विचार ना करता अंगठा धडावेगळा करून दिला. तसेच साधर्म्य असलेले प्रकार कमी अधिक प्रमाणात आज सुद्धा समाजात घडताना दिसून येत आहेत. माझी नोकरी आणि पदव्युत्तर शिक्षण हे तारेवरच्या कसरती प्रमाणे सुरू आहे. तिसरे सत्र संपताना मी माज्या प्रोजेक्ट गाईडला माज्या प्रोजेक्ट चं पूर्ण presentation दिलं. माझी कल्पना काय आहे आणि मी त्यात काय काय काम करणार आहे याबद्दल सर्व काही गोष्टी सविस्तर स्पष्ट केल्या. त्या नंतर चौथ्या सत्राच्या शेवटी जेव्हा मी माझा प्रोजेक्ट पूर्ण करून माज्या कॉलेज मध्

सुकाणू समिती बैठक पुणे

माझा जन्म शिक्षण सर्व काही पुण्यातच. माझं गाव चाकण जवळ अगदी १० १२ कि.मी. अंतरावर. मी शरद जोशी कधी प्रत्यक्ष पाहिले नाही किंवा ऐकले नाही याची नेहमी खंत वाटायची. जेव्हा सुकाणू समितीच्या जिल्हावार तारखा जाहीर झाल्या त्या दिवसापासून ठरवलं की आपण तिथे जायचं. पुण्यात अंतिम समारोपाला रविवार २३ जुलै २०१७ रोजी गुलटेकडी मार्केटयार्ड हे ठिकाण निश्चित झालं. मी शरद जोशी सरांची जेवढी शक्य तितकी पुस्तके आधीच वाचून काढली होती. त्यामुळं शरद जोशींचे शिष्य कसे बोलतात कसे विचार मांडतात एवढं पहायची मला खूप उत्सुकता होती. आणि तिथे जाण्यापूर्वी खूप काही प्रश्न सुद्धा तयार करून गेलो होतो की जेणेकरून जर तिथे संवाद झाला तर आपण त्यांना काही विचारू शकतो. सभेसाठी वेगवेगळ्या गावातून शेतकरी जमले होते. मंडप आणि इतर नियोजन पाहून मी जरा गोंधळून गेलो पण मनात म्हणलं की  इथे राजकीय सभा नाही त्यामुळं इतका विचार करायला नको. व्यासपीठावर अनेक हौशे नवशे स्वयंघोषित शेतकरी नेते जमा झाले होते. त्यापैकी काही सन्माननीय व्यक्ती सुद्धा होत्या. कार्यक्रमाची सुरुवात उत्साहाने झाली पण नंतर कार्यक्रमात रट्याळपणा वाढला. कोणी यायचा आणि