शेतकरी आत्महत्या आणि वास्तव
सोशल मीडियावर आपण नेहमी उपासमारी, कुपोषण, गरिबी, दारिद्र्याची छायाचित्रे पाहून हळहळ व्यक्त करतो. हळहळ व्यक्त करणाऱ्यांकडे तसही दुसरा काही उपाय सुद्धा नसतोच त्यामुळे फक्त हळहळ व्यक्त करतात. परंतु या विषयाच्या खोलात जाऊन कारणे आणि उपाय शोधण्याची मानसिकता बहुतेक वेळा कोणाचीच नसते. मुंबई पुणे सारख्या महानगरातील झोपडपट्टीत राहणारी लोकसंख्या ही मूळची दुष्काळग्रस्त भागातील आहे. त्यांच्यासोबत संवाद साधला तर आढळून आले की त्यांचे पूर्वज अल्पभूधारक किंवा जिरायती जमिनीचे शेतकरी होते. रोज सकाळी शहरात मजूर अड्ड्यावर दिसणारे लोक हे मूळचे शेतकरीच. सततचा दुष्काळ आणि हमीभावाची नसलेली शाश्वती व त्यामुळे डोक्यावर साचलेला कधी न संपणारा कर्जाचा डोंगर शेवटी त्या शेतकऱ्याला भूमिहीन बनवून महानगरात झोपड्यात राहून मजदूर बनायला प्रवृत्त करतो. तर कित्येक शेतकरी आत्महत्येला प्रवृत्त होतात. मी लहानपणापासून एक वाक्य ऐकायचो की,'काशीस जावे, नित्य वदावे'. अस म्हणायचे की मुलं नातवंड संसारात रमली की वयोवृद्ध जोडपं आपला कार्यभार मुलांच्या हाती सोपवून काशीला तीर्थाटनासाठी जातात. पण सध्या घडत असले...