Posts

Showing posts from December, 2018

डायरी

Image
माज्या अगदी जवळच्या परिचयाचे एक उद्योजक आहेत. त्यांची आणि माझी मैत्री काही वर्षांपासूनची आहे. ते माज्या वडिलांच्या समवयस्क आहेत. त्यांना त्यांच्या कारखान्यात कोणत्याही प्रकारची तांत्रिक अडचण आली की ते फक्त दोन व्यक्तींना कॉल करतात त्यापैकी एक मी असतो. त्या काकांना माज्या विषयी फार काही ठाऊक नाही. फक्त एक हुशार अभियंता आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीत काम करणारा मुलगा एवढीच त्यांना माझी ओळख. त्याव्यतिरिक्त माज्याबद्दल त्यांना काही ठाऊक नाही आणि मीसुद्धा स्वतःहून माज्याबाबत कधी जास्त व्यक्त देखील झालो नाही. ते नेहमी मला उद्योगा क्षेत्र, त्यातील आव्हाने, त्रुटी, समस्या, आर्थिक व्यवस्थापन आणि बारकावे बाबत माहिती देत असतात. नेहमीच्या कामाव्यतिरिक्त ते कधी कधी कौटुंबिक गप्पा सुद्धा मारत असतात. एक दिवस मला त्यांचा कॉल आला की आपल्याला सर्व Clients, Vendors, Supplier यांना नवीन वर्षाच्या डायरी द्यायच्या आहे. मी तुला नावाची यादी पाठवली आहे, मला फक्त स्टिकरच्या format मध्ये बसवून दे. त्यांनी सांगितल्या प्रमाणे मी सर्व व्यवस्थित बनवून दिलं. काही दिवसांनी परत त्यांचा रात्री उशिरा कॉल आला की मेल

मी, माझं गव्हाचं शेत आणि निवेदिताचा वाढदिवस

Image
तब्बल आठ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे २३ डिसेंबर २०१० रोजी मी माज्या आजोळगावी केंदूरला आमच्या शेतात गव्हाच्या पिकाला पाणी भरत होतो. सकाळचे ११ वाजले होते. अचानक निवेदिताचा मला कॉल आला आणि माज्यावर ती रागावली,"माझा आज वाढदिवस आहे आणि ठरल्याप्रमाणे सर्वजण केक कापण्यासाठी उपस्थित आहेत. फक्त तू नाही आलास." मी सांगितलं की शेतात आहे, गव्हाला पाणी देतोय त्यामुळे येऊ शकलो नाही. मी गेलो नाही म्हणून निवेदिता कॉलवर रडत होती. तिचं रडणं ऐकून मला अगदी अवघडल्यासारखे झाले. मी खूप मोठी चूक केल्यासारखं वाटू लागलं. त्या क्षणी माझा अवतार असा होता की चिखलाने माखलेले कपडे आणि हातात फावडे घेऊन पाण्यात उभा राहून कॉलवर बोलत असलेला मी  हातातले काम सोडून मी जाऊ सुद्धा शकत नव्हतो. कारण शेतीसाठी आठवड्यातून फक्त दोन दिवस वीजपुरवठा व्हायचा. त्या दिवशी जर पाणी दिलं नाही तर मला एक आठवडा थांबावं लागलं असतं किंवा मला मध्यरात्री कडाक्याच्या थंडीत जागून पाणी द्यावं लागलं असतं आणि पिकाचं सुद्धा मोठं नुकसान झालं असतं. लगेचच तिने मला कॉलवर धमकीवजा इशारा दिला की,"तू एक तासात इथे पोहोच, त्याश

गायत्री

Image
पु ल देशपांडे यांच्या रावसाहेब पुस्तकातील हा समास मला नेहमीच आवडतो, "एखाद्या माणसाची आणि आपली wavelength का जमावी आणि एखाद्याची का जमू नये ह्याला काही उत्तर नाही. १५-१५, २०-२० वर्षाच्या परिचयाची माणसे असतात पण शिष्टाचाराची घडी थोडीशी मोडण्यापलिकडे त्यांचा आपला कधी संबंध जात नाही. त्यांच्या घरी जाण होत भेटणं बोलणं होत. पण भेटी झाल्या तरी मनाच्या गाठी पडत नाहीत. आणि काही माणसं अगदी क्षणभरात जन्म जन्मांतरीच नातं असल्याप्रमाणे दुवा साधून जातात. वागण्यातला बेतशुद्धपणा क्षणार्धात नष्ट होतो. तिथे स्थलभिन्नत्व आड येत नाही, पूर्वसंस्कार, भाषा, चवी आवडी निवडी कशाचाही आधार लागत नाही. सूत जमून जातं आणि गाठी पक्क्या बसतात." आज गायत्रीचा ऑफिसमधील एक सहकारी म्हणून शेवटचा दिवस त्यामुळे वाईट तर वाटणारच. ऑफिसमध्ये पोहोचल्यापासून ते ऑफिसच्या बाहेर पडेपर्यंत माज्या तोंडून फक्त दोन व्यक्तींच्या नावांचा सर्वात जास्त जप केला जातो त्या दोन व्यक्ती म्हणजे गायत्री आणि ओंकार. या दोघांमुळे मला कधी कामात कोणती अडचण जाणवली नाही. गायत्री अशी आरोळी ठोकली की पुढच्याचं क्षणी ती माज्या बाजूला येऊन उभी दिसणा