Posts

Showing posts from May, 2021
Image
  २२ मे २०२१ च्या शनिवारी पहाटे मोबाईल वर अभिमन्यू दादांचा मेसेज येऊन धडकला "पप्पा गेले"! मेसेज वाचून धक्का बसला आणि पुन्हा फोन करून सांत्वन करण्यासाठी काय बोलणार हादेखील प्रश्न पडला. कारण बबनराव शेलार यांनी आपलं आयुष्य जसं स्वातंत्र्याचा उपभोक्ता म्हणून व्यतीत केलं मग त्यांच्या बौद्धिक वारश्याने संपन्न आणि पराकोटीची प्रगल्भता असलेल्या चिरंजीवांचं सांत्वन देखील कोणत्या शब्दात करणारं! अगदी सहज मनात आले की आज शरद जोशी असते तर त्यांनी शेतकरी संघटकच्या संपादकीयमध्ये "हुरहुन्नरी सोबती बबन गेला..." या आशयाचा अग्रलेख नक्कीच लिहिला असता. बबनराव शेलार म्हणजे एका सरंजामी देशमुख परंपरेचा वारसा लाभलेले परंतु शेतीतील सततच्या तोट्यामुळे अठराविश्व दारिद्र्याला सोबतीला घेऊन वाटचाल करणारे कुटुंबप्रमुख. स्वातंत्र्याची मूल्ये बहुदा त्यांच्या रक्तातच भिनुन आली असावीत. तुम्हाला बुद्धिवंत अथवा विचारवंत होण्यासाठी उच्च शिक्षणाची गरज लागत नाही हे बबन काका यांच्याकडे पाहूनच समजते. जेमतेम लीहिण्या-वाचण्यायोग्य शिक्षण असलेले बबन काका एक चालते फिरते विद्यापीठ आणि उत्तम निरीक्षक होते. व्यक्तीकड