Posts

Showing posts from July, 2017

शेतकरी पुत्रांचा स्वाभिमान

शनिवार २२ जुलै २०१७ दुपारची वेळ होती. कामानिमित्त वाघोलीला गेलो होतो. अचानक धुवांधार पाऊस सुरू झाला म्हणून आडोसा घ्यायला दुचाकी रस्त्याच्या बाजूला लावून एक छोट्या हॉटेलात थांबलो. पाऊस लवकर उघडण्याची चिन्हे दिसत नव्हती म्हणून तिथेच एक चहा घ्यायचं ठरवलं. बाजूला आचारी गरम गरम कांदाभजी तळत होता. छान वातावरण तयार झालं होतं. माज्याच बाजूला एक मजुराचं कुटुंब आडोशाला आलं, आई वडील व त्यांच्यासोबत अनुक्रमे अंदाजे ८ आणि ५ वर्षांचा मुलगा. आई वडील कसल्या तरी चिंतेत चर्चा करण्यात मग्न होते. दोन्ही मुले बराचवेळ खूप कुतूहलाने कांदाभजी कशी तयार केली जात आहे पाहत होते आणि मी त्यांच्याकडे पाहत होतो. माझा लहान भाचा जसा अशा गोष्टी आवडीने मागवून खातो अगदी तसंच काहीतरी मला त्यांच्या विषयी वाटलं. म्हणून ना राहवून मी त्यांना विचारलं की बाळा कांदाभजी खाणार का? मी देतो पैसे हॉटेलवाल्याला. पहिल्याच प्रश्नात ज्येष्ठ मुलगा नाही म्हणला. मग मी विषयांतर करत मोठ्या मुलाला कुठून आला काय करतोस विचारलं. तेव्हा तो बोलू लागला की मी अकोल्याचा आहे आणि शाळेत तिसरीला  जातो. त्याच्या सोबत बोलताना जाणवलं की ते कुटुंब अकोल्य

या ठिकाणी

या ठिकाणी... महाराष्ट्रात भाषण शैलीचे अनेक प्रकार आढळून येतात. त्यापैकी मला बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, प्रमोद महाजन आणि अटलजी यांची भाषण शैली जास्त आवडते. प्रत्येकाची आपापली एक खासियत असते. विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, राज ठाकरे, धनंजय मुंडे यांची भाषणे ही भाषणे नसून जणू काही श्रोत्यांच्या मनाला भिडणारा संवाद असतो. अटलजी, प्रमोद महाजन, शरद पवार, अजित पवार यांच्या भाषणात त्या विषय संबंधी सर्वच्या सर्व मुद्दे सामावून घेतलेले असतात. बाळासाहेबांच्या भाषणादरम्यानचा समयसुचक विराम सुद्धा टाळ्यांचा कडकडाट घेऊन जातो. छ. उदयनराजे भोसले, अजित पवार, रावसाहेब दानवे आणि बच्चू कडू हे अनकेदा आपल्या भाषणा मुळे अडचणीत आल्याच्या बातम्या आपण वाचतो. पण अडचणीत आले अस फक्त पुस्तकी भाषा बोलणाऱ्या लोकांना आणि माध्यमांना वाटतं प्रत्यक्षात त्यांची ही शैली ग्रामीण भागातील समर्थकांना जास्त भावते आणि ग्रामीण भागातील लोकांना कधीच ही भाषा गैर वाटत नाही उलट त्यांना ती भाषा आपली वाटते म्हणून ते सभेला गर्दी करतात. आता ग्रामीण भागातील विशिष्ट भाषण शैलीबद्दल पाहुयात. शेतकरी सभा, लग्न असो वा मयत दशक्रिया विधी सर्

सावरकर विचारसरणी आणि तथाकथित गोरक्षक

गोरक्षण झालं पाहिजे त्याबद्दल काही वाद नाही. माझे कित्येक मित्र गोरक्षण करतात आणि त्यांना समाजात, गावात मान सन्मान आहे. पण काही दिवसांपासून गोरक्षणाच्या नावे भाजपा आणि संघाचा जो गलिच्छपणा सुरू आहे त्याला कुठेतरी आवर घातला गेला पाहिजे. ज्या सावरकरांच्या नावे हे लोक पातळी सोडून राजकारण  करतात त्यांना सावरकर मुळीच कळले नाहीत. आणि हेच लोक इतरांना शिकवतात की सावरकर वाचा मग बोला. माझा या संघाच्या लोकांना सवाल आहे की तुम्हाला किती सावरकर कळलेत ते पहा आधी. काल परवा नाशिक महानगरपालिकेत गाईला श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम झाला. बातमीची लिंक सुद्धा सोबत देतोय. जे नगरसेवक या कार्यक्रमाला उपस्थित होते ते सर्व वैचारिक दिवाळखोरीचे मनोरुग्ण आहेत. त्यांनी सावरकरांच्या नावे फक्त हिंदुत्वाच घाणेरडं राजकारण केलंय. या लोकांनी कधी सावरकर वाचले सुद्धा नाहीत. या बालबुद्धि नेत्यांना आणि झाल्या प्रकारचं समर्थन करणाऱ्या लोकांना माझं एवढंच सांगणं आहे की, सावरकरांनी लिहिलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन कथा भाग २ मधील, क्रमांक ७ च्या पृष्ठावर सुरू होणारा बाळंतीण हा सत्य घटनेवर आधारित निबंध वाचा आणि जरा शरम वाटू द

संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी

संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी १३वे शतक हे महाराष्ट्राच्या भूमीसाठी अध्यात्मिक कालखंड म्हणून ओळखला जातो. या एकाच शतकात संत ज्ञानदेव, संत सावतामाळी आणि संत नामदेव यांचा सहवास या पुण्य भूमीला लाभला. त्यापैकी संत सावतामाळी हे कोणत्या विशिष्ट जातीचे नव्हे तर एक विज्ञानवादी दृष्टिकोन असलेले संत म्हणून ओळखले जातात. आज कित्येक लोकांच्या घरात, वाहनावर आणि अगदीच फेसबुक वॉट्सअपचा डीपी म्हणून छायाचित्र दिसेल. परंतु याच लोकांना त्यांचं चरित्र आणि विचार किती ठाऊक आहेत हा एक संशोधनाचा विषय आहे. सावता महाराज स्वतः एक आयुर्वेद तज्ञ होते. गावात लोकांच्या वेगवेगळ्या आजारांवर उपचार करत असत. आजार ठीक व्हावा म्हणून त्यांनी नवस वेगेरे करण्याला नेहमी विरोध केला. गावात जेव्हा कावीळ सदृश पटकीची साथ आली तेव्हा लोक म्हणले देवी कोपली. सावता माळी यांनी स्वतः घरोघर जाऊन पाणी उकळून प्यावे आणि दररोज अंघोळ करून शरीराची स्वच्छता ठेवली तर पटकी आजार बरा होईल, यासाठी जनजागृती केली. कर्मकांडाला त्यांनी कधी थारा दिला नाही. शेतात नांगरणी करताना आडवा येणारा म्हसोबा त्यांनी स्वतः उखडून बांधावर नेऊन ठेवला. देवाच्या

अध्यात्म आणि समुपदेशन

आज सकाळी सहज चॅनेल्स बदलत बसलो होतो TV वर. अचानक अध्यात्मिक चॅनेल लागला म्हणून थोडं ज्ञान घ्यायला पाहत बसलो. तिथे एका अध्यात्मिक महाराजांची सभा सुरू होती आणि त्यात प्रश्नोत्तराचा कार्यक्रम चालू होता. एक महिला रडत रडत उभी राहिली आणि सांगू लागली की माझा मुलगा लहान आहे आणि त्याला खूप शिकवायचं मोठं करायचंय, पण तो घरात कोणाचं ऐकत नाही काय करू महाराज? मला वाटलं ते महाराज काहीतरी समुपदेशन करतील, पण ते तर याहून बहाद्दर निघाले. त्यांनी सरळ अध्यत्माच्या गाभ्यात घुसून ज्ञान देऊ लागले. अगदी माज्या डोक्यावरून त्या ज्ञानाची विमाने भराभर उडून गेली. ते पाहून हसावं की रडावं हे समजेना. काय राव ऐकावं ते नवलच. धन्य ती माता, धन्य तिचा तो खोडकर पोरगा आणि धन्य धन्य ते अध्यात्मिक बाबा... थोड्या बहुत फरकाने सर्वच धर्मात अशा महाराजांचा सुळसुळाट झालाय. त्या महिलेला एकच मोलाचा सल्ला घ्यावा वाटतो की तिने सरळ पोराला घेऊन निवृत्ती महाराज इंदुरीकरांकडे जावं. समुपदेशाच्या एक झटक्यात माता-पिता-पुत्र सरळ होतील. #पंकज_गायकवाड #माझी_लेखणी #अध्यात्म_आणि_समुपदेशन