सावरकर विचारसरणी आणि तथाकथित गोरक्षक

गोरक्षण झालं पाहिजे त्याबद्दल काही वाद नाही. माझे कित्येक मित्र गोरक्षण करतात आणि त्यांना समाजात, गावात मान सन्मान आहे. पण काही दिवसांपासून गोरक्षणाच्या नावे भाजपा आणि संघाचा जो गलिच्छपणा सुरू आहे त्याला कुठेतरी आवर घातला गेला पाहिजे.

ज्या सावरकरांच्या नावे हे लोक पातळी सोडून राजकारण  करतात त्यांना सावरकर मुळीच कळले नाहीत. आणि हेच लोक इतरांना शिकवतात की सावरकर वाचा मग बोला. माझा या संघाच्या लोकांना सवाल आहे की तुम्हाला किती सावरकर कळलेत ते पहा आधी.

काल परवा नाशिक महानगरपालिकेत गाईला श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम झाला. बातमीची लिंक सुद्धा सोबत देतोय. जे नगरसेवक या कार्यक्रमाला उपस्थित होते ते सर्व वैचारिक दिवाळखोरीचे मनोरुग्ण आहेत. त्यांनी सावरकरांच्या नावे फक्त हिंदुत्वाच घाणेरडं राजकारण केलंय. या लोकांनी कधी सावरकर वाचले सुद्धा नाहीत.

या बालबुद्धि नेत्यांना आणि झाल्या प्रकारचं समर्थन करणाऱ्या लोकांना माझं एवढंच सांगणं आहे की, सावरकरांनी लिहिलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन कथा भाग २ मधील, क्रमांक ७ च्या पृष्ठावर सुरू होणारा बाळंतीण हा सत्य घटनेवर आधारित निबंध वाचा आणि जरा शरम वाटू द्या आपण काय कृत्य केलंय.

मला ठाऊक आहे की यांच्या पैकी कित्येक अडाणी लोकांकडे हे पुस्तक नाहीये म्हणून तुमच्यासाठी भाग १ व २ ची एकत्रीत  PDF link देतोय. Download करून पृष्ठ क्रमांक १०४ वरील बाळंतीण हा निबंध वाचावा.


अंधश्रद्धा निर्मूलन कथा भाग १ व २
http://savarkar.org/mr/encyc/2017/5/28/andhashradhha-nirmulan-katha-kh6-mr-v002.pdf

http://m.timesofindia.com/city/nashik/nashik-municipal-corporation-pays-tribute-to-cow/articleshow/59701315.cms

#पंकज_गायकवाड
#माझी_लेखणी
#गोरक्षण
#सावरकर

Comments

Popular posts from this blog

सुरेशचंद्र म्हात्रे सर

शेतकरी पुत्रांचा स्वाभिमान

अध्यात्म आणि समुपदेशन