संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी

संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी

१३वे शतक हे महाराष्ट्राच्या भूमीसाठी अध्यात्मिक कालखंड म्हणून ओळखला जातो. या एकाच शतकात संत ज्ञानदेव, संत सावतामाळी आणि संत नामदेव यांचा सहवास या पुण्य भूमीला लाभला.

त्यापैकी संत सावतामाळी हे कोणत्या विशिष्ट जातीचे नव्हे तर एक विज्ञानवादी दृष्टिकोन असलेले संत म्हणून ओळखले जातात. आज कित्येक लोकांच्या घरात, वाहनावर आणि अगदीच फेसबुक वॉट्सअपचा डीपी म्हणून छायाचित्र दिसेल. परंतु याच लोकांना त्यांचं चरित्र आणि विचार किती ठाऊक आहेत हा एक संशोधनाचा विषय आहे.

सावता महाराज स्वतः एक आयुर्वेद तज्ञ होते. गावात लोकांच्या वेगवेगळ्या आजारांवर उपचार करत असत. आजार ठीक व्हावा म्हणून त्यांनी नवस वेगेरे करण्याला नेहमी विरोध केला. गावात जेव्हा कावीळ सदृश पटकीची साथ आली तेव्हा लोक म्हणले देवी कोपली. सावता माळी यांनी स्वतः घरोघर जाऊन पाणी उकळून प्यावे आणि दररोज अंघोळ करून शरीराची स्वच्छता ठेवली तर पटकी आजार बरा होईल, यासाठी जनजागृती केली.

कर्मकांडाला त्यांनी कधी थारा दिला नाही. शेतात नांगरणी करताना आडवा येणारा म्हसोबा त्यांनी स्वतः उखडून बांधावर नेऊन ठेवला. देवाच्या नावाने दिला जाणाऱ्या प्राण्याच्या बळी विरोधात त्यांनी आवाज उठवला. अरे जो देव जीवांचं पालन करतो तो कशाला बळी मागेल? इतके स्पष्ट विचार होते त्यांचे.

सावता महाराज कधी स्वतःची शेताची कामे सोडून वारीला गेले नाहीत. त्यांनी आपल्या कामाला भक्ती मानून त्यात देव मानला. शेवटी सावता महाराज यांच्यावर प्रसन्न होऊन प्रत्यक्ष विठुरायाला भक्ताच्या भेटीसाठी त्यांच्या मळ्यात यावं लागलं.

एकूणच तात्पर्य काय तर संत शिरोमणी सावता महाराज यांना आपण जातीच्या जोखडातून मुक्त करून आणि फक्त त्यांच्या नावाचा उपवाह करण्या ऐवजी त्यांचे विचार आत्मसात केले पाहिजेत तरच आपल्या आणि पुढच्या पिढ्यांना उज्वल भवितव्य आहे.

#संत_शिरोमणी_सावता_महाराज
#पंकज_गायकवाड
#माझी_लेखणी

Comments

Popular posts from this blog

सुरेशचंद्र म्हात्रे सर

शेतकरी पुत्रांचा स्वाभिमान

अध्यात्म आणि समुपदेशन