अध्यात्म आणि समुपदेशन

आज सकाळी सहज चॅनेल्स बदलत बसलो होतो TV वर. अचानक अध्यात्मिक चॅनेल लागला म्हणून थोडं ज्ञान घ्यायला पाहत बसलो. तिथे एका अध्यात्मिक महाराजांची सभा सुरू होती आणि त्यात प्रश्नोत्तराचा कार्यक्रम चालू होता.
एक महिला रडत रडत उभी राहिली आणि सांगू लागली की माझा मुलगा लहान आहे आणि त्याला खूप शिकवायचं मोठं करायचंय, पण तो घरात कोणाचं ऐकत नाही काय करू महाराज?

मला वाटलं ते महाराज काहीतरी समुपदेशन करतील, पण ते तर याहून बहाद्दर निघाले. त्यांनी सरळ अध्यत्माच्या गाभ्यात घुसून ज्ञान देऊ लागले. अगदी माज्या डोक्यावरून त्या ज्ञानाची विमाने भराभर उडून गेली. ते पाहून हसावं की रडावं हे समजेना.
काय राव ऐकावं ते नवलच.

धन्य ती माता, धन्य तिचा तो खोडकर पोरगा आणि धन्य धन्य ते अध्यात्मिक बाबा...

थोड्या बहुत फरकाने सर्वच धर्मात अशा महाराजांचा सुळसुळाट झालाय.

त्या महिलेला एकच मोलाचा सल्ला घ्यावा वाटतो की तिने सरळ पोराला घेऊन निवृत्ती महाराज इंदुरीकरांकडे जावं. समुपदेशाच्या एक झटक्यात माता-पिता-पुत्र सरळ होतील.

#पंकज_गायकवाड
#माझी_लेखणी
#अध्यात्म_आणि_समुपदेशन

Comments

  1. भारी लिहीत आहात सर किप इट अप

    ReplyDelete
    Replies
    1. आपले कृपाशीर्वाद असेच सोबती असुद्या

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

सुरेशचंद्र म्हात्रे सर

शेतकरी पुत्रांचा स्वाभिमान