अजूनही क्रांतिसूर्य महात्मा फुलेंचे विचार उमजले नाहीत का...?
आज महात्मा ज्योतीराव फुले यांची जयंती. महात्मा फुले नाव ऐकलं की आपल्या डोळ्यासमोर फक्त त्यांनी बहुजनांसाठी खुली केलेली विहीर आणि स्त्री शिक्षणासाठी घेतलेला पुढाकार इतक्याच गोष्टी आठवतात आणि महात्मा फुले यांची उपलब्ध छायाचित्र दाखवून दरिद्री प्रतिमा नेहमी समोर आणली जाते. पण खरंच महात्मा फुले यांचे कार्य बहुजन सुधारणे इतपत मर्यादित होते का? तर अजिबात नाही. शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेले ज्योतीराव यांनी मोठ्या कष्टाने वडिलांना मदत करून स्वतःचे शिक्षण पूर्ण केले व समाजातील अनिष्ठ प्रथा विरोधात आवाज उठवला. इतकेच नव्हे तर त्यांनी उच्च शिक्षणाद्वारे एक यशस्वी व्यावसायिक बनले. व्यवसाय करत असताना त्यांचा देशी विदेशी लोकांसोबत संबंध आला आणि त्यातून भारतीय व पाश्चिमात्य संस्कृतीचा अभ्यास करून त्यांनी भारतीय समाजातील चुकीच्या प्रथांचे उच्चाटन करण्याचे ठरविले. या कामी त्यांना तत्कालीन कर्मठ लोकांनी प्रखर विरोध केला परंतु या विरोधाला ना जुमानता त्यांना समाजातील विविध स्तरातील अनेक जाती धर्माच्या लोकांनी सहकार्य केले म्हणून आज आपण एक पुरोगामी राष्ट्राचे नागरिक म्हणून अभिमानाने पाठ थोपटून घेऊ शकतो. न...