आधुनिक द्रोणाचार्य आणि एकलव्य

महाभारताच्या काव्या मध्ये एकलव्य आणि द्रोणाचार्य यांची कथा प्रसिद्ध आहे. त्या कथेमध्ये द्रोणाचार्यांनी एकलव्याला शिष्य म्हणून स्वीकारलं नाही तरी सुद्धा त्याने द्रोणाचार्यांची मूर्ती बनवून त्या मूर्तीला गुरूस्थानी मानून सराव करत धनुर्विद्या अवगत केली आणि तो याबाबत द्रोणाचार्यांचा लाडका शिष्य अर्जुना पेक्षा सुद्धा सरस ठरला. द्रोणाचार्यांना हे समजताच त्यांचा अहंकार दुखावला जाऊन त्यांनी गुरुदक्षिणा म्हणून एकलव्याला उजव्या हाताचा अंगठा म्हणजेच त्याची धनुर्विद्या नष्ट करण्याची दक्षिणा मागितली. तरी सुद्धा एकलव्याने कसलाही विचार ना करता अंगठा धडावेगळा करून दिला.

तसेच साधर्म्य असलेले प्रकार कमी अधिक प्रमाणात आज सुद्धा समाजात घडताना दिसून येत आहेत. माझी नोकरी आणि पदव्युत्तर शिक्षण हे तारेवरच्या कसरती प्रमाणे सुरू आहे. तिसरे सत्र संपताना मी माज्या प्रोजेक्ट गाईडला माज्या प्रोजेक्ट चं पूर्ण presentation दिलं. माझी कल्पना काय आहे आणि मी त्यात काय काय काम करणार आहे याबद्दल सर्व काही गोष्टी सविस्तर स्पष्ट केल्या. त्या नंतर चौथ्या सत्राच्या शेवटी जेव्हा मी माझा प्रोजेक्ट पूर्ण करून माज्या कॉलेज मध्ये प्राध्यापकांना final submit करायला गेलो तेव्हा त्यांनी मला सांगितलं की माज्या guide ने माझा प्रोजेक्ट या सत्रात submit करून ना घेण्याचा निर्णय घेतला आहे. प्राध्यापकांना मी याचं कारण विचारलं असता त्यांनी सांगितलं की जरी  प्रोजेक्ट यशस्वी झालेला असला तरी तू Guide ची वारंवार भेट घेतली नाहीस त्यामुळे त्यांनी तुझा प्रोजेक्ट submit करायला नकार दिला आहे. तू पुढच्या semester ला येऊन submit कर आता.

मी होकारार्थी मान हलवली आणि काही ना बोलता तिथून तडक बाहेर पडलो. बाहेर आल्यावर माज्या सर्व मित्र मैत्रिणींनी मला सल्ला दिला की मी Guide ला ताबडतोब जाऊन कळकळीची विनवणी करावी मग ते तयार होतील. मी त्यांना स्पष्ट नकार दिला आणि सांगितलं की,"माझं प्रोजेक्टच काम पूर्ण झालं आहे. जर त्यांना त्यांचा अहंकार प्रिय असेल तर मला माझा स्वाभिमान त्याहून जास्त प्रिय आहे. एक वर्ष वाया गेल्याने माझ्यावर काही आभाळ नाही कोसळणार. मी पुढच्या सत्रात येऊन submit करेल. पण त्यांच्या समोर अजिबात नाही झुकणार."

कॉलेजच्या पायऱ्या उतरताना अभिमान वाटत होता आणि वाईट सुद्धा वाटत होतं. अभिमान या गोष्टीचा वाटत होता कारण इतरांच्या अहंकारासाठी मी माझी नैतिकता सोडली नाही आणि स्वाभिमान दुखावुन घेतला नाही. वाईट सुद्धा वाटत होतं कारण  कित्येक एकलव्यरुपी शिष्यांचे या कालबाह्य शिक्षण पद्धतीमुळे शोषण होत आहे आणि एकलव्याची धनुर्विद्या नष्ट करणाऱ्या शोषक द्रोणाचार्यांची मानसिकता आज सुद्धा समाजात जिवंत आहे!

#आधुनिक_द्रोणाचार्य_आणि_एकलव्य
#पंकज_गायकवाड
#माझी_लेखणी
pankajsgaikwad@blogspot.com

Comments

Popular posts from this blog

सुरेशचंद्र म्हात्रे सर

शेतकरी पुत्रांचा स्वाभिमान

अध्यात्म आणि समुपदेशन