डायरी
माज्या अगदी जवळच्या परिचयाचे एक उद्योजक आहेत. त्यांची आणि माझी मैत्री काही वर्षांपासूनची आहे. ते माज्या वडिलांच्या समवयस्क आहेत. त्यांना त्यांच्या कारखान्यात कोणत्याही प्रकारची तांत्रिक अडचण आली की ते फक्त दोन व्यक्तींना कॉल करतात त्यापैकी एक मी असतो. त्या काकांना माज्या विषयी फार काही ठाऊक नाही. फक्त एक हुशार अभियंता आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीत काम करणारा मुलगा एवढीच त्यांना माझी ओळख. त्याव्यतिरिक्त माज्याबद्दल त्यांना काही ठाऊक नाही आणि मीसुद्धा स्वतःहून माज्याबाबत कधी जास्त व्यक्त देखील झालो नाही. ते नेहमी मला उद्योगा क्षेत्र, त्यातील आव्हाने, त्रुटी, समस्या, आर्थिक व्यवस्थापन आणि बारकावे बाबत माहिती देत असतात. नेहमीच्या कामाव्यतिरिक्त ते कधी कधी कौटुंबिक गप्पा सुद्धा मारत असतात. एक दिवस मला त्यांचा कॉल आला की आपल्याला सर्व Clients, Vendors, Supplier यांना नवीन वर्षाच्या डायरी द्यायच्या आहे. मी तुला नावाची यादी पाठवली आहे, मला फक्त स्टिकरच्या format मध्ये बसवून दे. त्यांनी सांगितल्या प्रमाणे मी सर्व व्यवस्थित बनवून दिलं. काही दिवसांनी परत त्यांचा रात्री उशिरा कॉल आला की मेल...