शेतकरी पुत्रांचा स्वाभिमान
शनिवार २२ जुलै २०१७ दुपारची वेळ होती. कामानिमित्त वाघोलीला गेलो होतो. अचानक धुवांधार पाऊस सुरू झाला म्हणून आडोसा घ्यायला दुचाकी रस्त्याच्या बाजूला लावून एक छोट्या हॉटेलात थांबलो. पाऊस लवकर उघडण्याची चिन्हे दिसत नव्हती म्हणून तिथेच एक चहा घ्यायचं ठरवलं. बाजूला आचारी गरम गरम कांदाभजी तळत होता. छान वातावरण तयार झालं होतं. माज्याच बाजूला एक मजुराचं कुटुंब आडोशाला आलं, आई वडील व त्यांच्यासोबत अनुक्रमे अंदाजे ८ आणि ५ वर्षांचा मुलगा. आई वडील कसल्या तरी चिंतेत चर्चा करण्यात मग्न होते. दोन्ही मुले बराचवेळ खूप कुतूहलाने कांदाभजी कशी तयार केली जात आहे पाहत होते आणि मी त्यांच्याकडे पाहत होतो. माझा लहान भाचा जसा अशा गोष्टी आवडीने मागवून खातो अगदी तसंच काहीतरी मला त्यांच्या विषयी वाटलं. म्हणून ना राहवून मी त्यांना विचारलं की बाळा कांदाभजी खाणार का? मी देतो पैसे हॉटेलवाल्याला. पहिल्याच प्रश्नात ज्येष्ठ मुलगा नाही म्हणला. मग मी विषयांतर करत मोठ्या मुलाला कुठून आला काय करतोस विचारलं. तेव्हा तो बोलू लागला की मी अकोल्याचा आहे आणि शाळेत तिसरीला जातो. त्याच्या सोबत बोलताना जाणवलं की ते कुटुंब अक...