माज्या पत्रिकेतील "पितृदोष"
माज्या पत्रिकेतील "पितृदोष" https://PankajSGaikwad.blogspot.com अभियांत्रिकीच्या वापरलेल्या वह्यांची रद्दी चाळत असताना मला त्यात एक ज्योतिषाने पितृदोषाच्या शांती साठी लागणाऱ्या वस्तूंच्या यादीचा कागद सापडला आणि मी लगेचच पाच वर्षांपूर्वीच्या भूतकाळात शिरलो. अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षाचा निकाल लागला, ते वर्ष होत २०१२. मी खूप मेहनत करून अभ्यास केला होता त्यामुळे पास(!) होण्याची निश्चितच खात्री होती. निकाल लागला! आणि खरंच माझा निकाल लागला व ४ विषयांसोबत मी नापास झालो. अभियांत्रिकीला नापास होणे म्हणजे काही विशेष गोष्ट नसते परंतु अभ्यास करून जर नापास झालात तर ती फारचं वेदनादायक गोष्ट असते हे कोणताही अभियंता सांगू शकेल. खरं वाईट तेव्हाच वाटत की जेव्हा तुम्ही सर्व मित्रमंडळी एकत्र अभ्यास करून तुमचे सर्व मित्र उत्तीर्ण होतात आणि फक्त तुम्ही एकटे नापास होतात, खरंच फारच वेदनादायी असतं! त्यानंतर आलेले अनुभव हा माज्या आयुष्यातील सुवर्णकाळ मानतो मी. आपले मित्र आपल्याला कसा सल्ला देतात सहकार्य करतात त्यातून आपण कसे शिकत जातो हे महत्त्वाचं. असंच नापास का झालो म्हणून दिवसभर चिंतन क...