Posts

अजूनही क्रांतिसूर्य महात्मा फुलेंचे विचार उमजले नाहीत का...?

आज महात्मा ज्योतीराव फुले यांची जयंती. महात्मा फुले नाव ऐकलं की आपल्या डोळ्यासमोर फक्त त्यांनी बहुजनांसाठी खुली केलेली विहीर आणि स्त्री शिक्षणासाठी घेतलेला पुढाकार इतक्याच गोष्टी आठवतात आणि महात्मा फुले यांची उपलब्ध छायाचित्र दाखवून दरिद्री प्रतिमा नेहमी समोर आणली जाते. पण खरंच महात्मा फुले यांचे कार्य बहुजन सुधारणे इतपत मर्यादित होते का? तर अजिबात नाही. शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेले ज्योतीराव यांनी मोठ्या कष्टाने वडिलांना मदत करून स्वतःचे शिक्षण पूर्ण केले व समाजातील अनिष्ठ प्रथा विरोधात आवाज उठवला. इतकेच नव्हे तर त्यांनी उच्च शिक्षणाद्वारे एक यशस्वी व्यावसायिक बनले. व्यवसाय करत असताना त्यांचा देशी विदेशी लोकांसोबत संबंध आला आणि त्यातून भारतीय व पाश्चिमात्य संस्कृतीचा अभ्यास करून त्यांनी भारतीय समाजातील चुकीच्या प्रथांचे उच्चाटन करण्याचे ठरविले. या कामी त्यांना तत्कालीन कर्मठ लोकांनी प्रखर विरोध केला परंतु या विरोधाला ना जुमानता त्यांना समाजातील विविध स्तरातील अनेक जाती धर्माच्या लोकांनी सहकार्य केले म्हणून आज आपण एक पुरोगामी राष्ट्राचे नागरिक म्हणून अभिमानाने पाठ थोपटून घेऊ शकतो. न...

अर्धवट ज्ञान हीच अर्धवट दरिद्री!

काही दिवसांपूर्वी म्हणजेच ७ ऑक्टोबर २०१७ रोजी आळंदीला जाण्याचा योग आला होता. नेहमीच्याच सवयीप्रमाणे संत ज्ञानेश्वर महाराजांच दर्शन झाल्यावर पुस्तकांच्या दुकानात रमून गेलो. तिथे मला दीपकने सुचविलेले १९३१ साली प्रकाशित ह. भ. प. निवृत्ती वक्ते महाराज लिखित श्री मुक्ताबाई चरित्र मिळालं. त्या ग्रंथाच्या चटकन दोन प्रत विकत घेऊन त्यातील एक प्रत मी दीपकला त्याच्या घरी नेऊन दिली आणि त्याच्याकडून माघारी येताना वाघोलीला नेहमीच्या शिरस्त्या प्रमाणे वाघेश्वराचं दर्शन घ्यायला निघालो असता पावसाने हजेरी लावलीच! कसाबसा मंदिराच्या बाहेर चपला काढून गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेऊन मी सभामंडपात स्थिरावलो. परतीचा पाऊस इतका प्रचंड होता की तो इतक्यात काही थांबण्याची चिन्हे दिसत नव्हती. तेवढ्यात माज्या ध्यानात आलं की माज्या जवळ ग्रंथ आहे वाचायला, मग काय झालंच! माझी तिथेच वाचनाची बैठक सुरू झाली. सर्व काही भान विसरून मी ग्रंथ वाचण्यातच मग्न झालो. काही वेळाने पावसाच्या सरींचा आवाज कमी झाला म्हणून सहज घड्याळात पाहिलं तर रात्रीचे १० वाजले होते म्हणजे मी सलग तीन तास मंदिरात ग्रंथ वाचत होतो आणि एवढा वेळ देऊन सुद्धा माझं...

शेतकरी आत्महत्या आणि वास्तव

सोशल मीडियावर आपण नेहमी उपासमारी, कुपोषण, गरिबी, दारिद्र्याची छायाचित्रे पाहून हळहळ व्यक्त करतो. हळहळ व्यक्त करणाऱ्यांकडे तसही दुसरा काही उपाय सुद्धा नसतोच त्यामुळे फक्त हळहळ व्यक्त करतात. परंतु या विषयाच्या खोलात जाऊन कारणे आणि उपाय शोधण्याची मानसिकता बहुतेक वेळा कोणाचीच नसते. मुंबई पुणे सारख्या महानगरातील झोपडपट्टीत राहणारी लोकसंख्या ही मूळची दुष्काळग्रस्त भागातील आहे. त्यांच्यासोबत संवाद साधला तर आढळून आले की त्यांचे पूर्वज अल्पभूधारक किंवा जिरायती जमिनीचे शेतकरी होते. रोज सकाळी शहरात मजूर अड्ड्यावर दिसणारे लोक हे मूळचे शेतकरीच. सततचा दुष्काळ आणि हमीभावाची नसलेली शाश्वती व त्यामुळे डोक्यावर साचलेला कधी न संपणारा कर्जाचा डोंगर शेवटी त्या शेतकऱ्याला भूमिहीन बनवून महानगरात झोपड्यात राहून मजदूर बनायला प्रवृत्त करतो. तर कित्येक शेतकरी आत्महत्येला प्रवृत्त होतात. मी लहानपणापासून एक वाक्य ऐकायचो की,'काशीस जावे, नित्य वदावे'. अस म्हणायचे की मुलं नातवंड संसारात रमली की वयोवृद्ध जोडपं आपला कार्यभार मुलांच्या हाती सोपवून काशीला तीर्थाटनासाठी जातात. पण सध्या घडत असले...

परसबाग आणि सेंद्रिय शेतीचा बोलबाला

आज सकाळी उठल्या उठल्या हातात The Hindu वृत्तपत्र घेतलं आणि त्याच्या पहिल्याच पानावर खालील बाजूला एक विशेष बातमी होती आणि तिचं नाव होतं * "A rooftop farmer rises with rice" * कर्नाटकातील मंगळुरु येथील एका प्राध्यापकाने आपल्या बालकणी मधील १२०० चौरस फूट परसबागेत तांदूळ, हळद आणि इतर फळभाज्यांचं उत्पादन घेऊन स्वतःच्या घरासाठी वापरलं. त्यासाठी प्राध्यापकांनी सेंद्रिय खताचा वापर केला. आजकाल परसबाग शेतीच खूपच फॅड आलाय. कुंडीत वांगी, कुंडीत टोमॅटो वेगेरे. आमच्या पुण्यात तर परसबाग साठी शेकडो पुस्तके मिळतात. माझं तर स्पष्ट मत आहे की परसबाग एक नौटंकी आहे त्यामुळे कोणता व्यक्ती स्वयंपूर्ण होऊ शकत नाही. त्यासाठी तुम्हाला शेतकरी आणि त्याची शेती फायद्यात आणली पाहिजे तेव्हा कुठे पेट्रोकेमिकल विरहित भाजीपाला तुम्हाला मिळू शकतो. यावरून मला काही प्रश्न पडले आणि लोकांना सुद्धा नेहमी पडतात. परसबागेतील पिकाचा उत्पादन खर्च हा निश्चितच शेतातील उत्पादनखर्च पेक्षा जास्तच असणार, परंतु भांडवल आहे आणि एक छंद किंवा रासायनिक खत विरहित पिकं म्हणून ते प्राध्यापक त्याच उत्पादन घेत असावेत. परंतु हे करत असतान...

माज्या पत्रिकेतील "पितृदोष"

माज्या पत्रिकेतील "पितृदोष" https://PankajSGaikwad.blogspot.com अभियांत्रिकीच्या वापरलेल्या वह्यांची रद्दी चाळत असताना मला त्यात एक ज्योतिषाने पितृदोषाच्या शांती साठी लागणाऱ्या वस्तूंच्या यादीचा कागद सापडला आणि मी लगेचच पाच वर्षांपूर्वीच्या भूतकाळात शिरलो. अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षाचा निकाल लागला, ते वर्ष होत २०१२. मी खूप मेहनत करून अभ्यास केला होता त्यामुळे पास(!) होण्याची निश्चितच खात्री होती. निकाल लागला! आणि खरंच माझा निकाल लागला व ४ विषयांसोबत मी नापास झालो. अभियांत्रिकीला नापास होणे म्हणजे काही विशेष गोष्ट नसते परंतु अभ्यास करून जर नापास झालात तर ती फारचं वेदनादायक गोष्ट असते हे कोणताही अभियंता सांगू शकेल. खरं वाईट तेव्हाच वाटत की जेव्हा तुम्ही सर्व मित्रमंडळी एकत्र अभ्यास करून तुमचे सर्व मित्र उत्तीर्ण होतात आणि फक्त तुम्ही एकटे नापास होतात, खरंच फारच वेदनादायी असतं! त्यानंतर आलेले अनुभव हा माज्या आयुष्यातील सुवर्णकाळ मानतो मी. आपले मित्र आपल्याला कसा सल्ला देतात सहकार्य करतात त्यातून आपण कसे शिकत जातो हे महत्त्वाचं. असंच नापास का झालो म्हणून दिवसभर चिंतन क...

आधुनिक द्रोणाचार्य आणि एकलव्य

महाभारताच्या काव्या मध्ये एकलव्य आणि द्रोणाचार्य यांची कथा प्रसिद्ध आहे. त्या कथेमध्ये द्रोणाचार्यांनी एकलव्याला शिष्य म्हणून स्वीकारलं नाही तरी सुद्धा त्याने द्रोणाचार्यांची मूर्ती बनवून त्या मूर्तीला गुरूस्थानी मानून सराव करत धनुर्विद्या अवगत केली आणि तो याबाबत द्रोणाचार्यांचा लाडका शिष्य अर्जुना पेक्षा सुद्धा सरस ठरला. द्रोणाचार्यांना हे समजताच त्यांचा अहंकार दुखावला जाऊन त्यांनी गुरुदक्षिणा म्हणून एकलव्याला उजव्या हाताचा अंगठा म्हणजेच त्याची धनुर्विद्या नष्ट करण्याची दक्षिणा मागितली. तरी सुद्धा एकलव्याने कसलाही विचार ना करता अंगठा धडावेगळा करून दिला. तसेच साधर्म्य असलेले प्रकार कमी अधिक प्रमाणात आज सुद्धा समाजात घडताना दिसून येत आहेत. माझी नोकरी आणि पदव्युत्तर शिक्षण हे तारेवरच्या कसरती प्रमाणे सुरू आहे. तिसरे सत्र संपताना मी माज्या प्रोजेक्ट गाईडला माज्या प्रोजेक्ट चं पूर्ण presentation दिलं. माझी कल्पना काय आहे आणि मी त्यात काय काय काम करणार आहे याबद्दल सर्व काही गोष्टी सविस्तर स्पष्ट केल्या. त्या नंतर चौथ्या सत्राच्या शेवटी जेव्हा मी माझा प्रोजेक्ट पूर्ण करून माज्या कॉलेज मध्...

सुकाणू समिती बैठक पुणे

माझा जन्म शिक्षण सर्व काही पुण्यातच. माझं गाव चाकण जवळ अगदी १० १२ कि.मी. अंतरावर. मी शरद जोशी कधी प्रत्यक्ष पाहिले नाही किंवा ऐकले नाही याची नेहमी खंत वाटायची. जेव्हा सुकाणू समितीच्या जिल्हावार तारखा जाहीर झाल्या त्या दिवसापासून ठरवलं की आपण तिथे जायचं. पुण्यात अंतिम समारोपाला रविवार २३ जुलै २०१७ रोजी गुलटेकडी मार्केटयार्ड हे ठिकाण निश्चित झालं. मी शरद जोशी सरांची जेवढी शक्य तितकी पुस्तके आधीच वाचून काढली होती. त्यामुळं शरद जोशींचे शिष्य कसे बोलतात कसे विचार मांडतात एवढं पहायची मला खूप उत्सुकता होती. आणि तिथे जाण्यापूर्वी खूप काही प्रश्न सुद्धा तयार करून गेलो होतो की जेणेकरून जर तिथे संवाद झाला तर आपण त्यांना काही विचारू शकतो. सभेसाठी वेगवेगळ्या गावातून शेतकरी जमले होते. मंडप आणि इतर नियोजन पाहून मी जरा गोंधळून गेलो पण मनात म्हणलं की  इथे राजकीय सभा नाही त्यामुळं इतका विचार करायला नको. व्यासपीठावर अनेक हौशे नवशे स्वयंघोषित शेतकरी नेते जमा झाले होते. त्यापैकी काही सन्माननीय व्यक्ती सुद्धा होत्या. कार्यक्रमाची सुरुवात उत्साहाने झाली पण नंतर कार्यक्रमात रट्याळपणा वाढला. कोणी यायचा...