Posts

डायरी

Image
माज्या अगदी जवळच्या परिचयाचे एक उद्योजक आहेत. त्यांची आणि माझी मैत्री काही वर्षांपासूनची आहे. ते माज्या वडिलांच्या समवयस्क आहेत. त्यांना त्यांच्या कारखान्यात कोणत्याही प्रकारची तांत्रिक अडचण आली की ते फक्त दोन व्यक्तींना कॉल करतात त्यापैकी एक मी असतो. त्या काकांना माज्या विषयी फार काही ठाऊक नाही. फक्त एक हुशार अभियंता आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीत काम करणारा मुलगा एवढीच त्यांना माझी ओळख. त्याव्यतिरिक्त माज्याबद्दल त्यांना काही ठाऊक नाही आणि मीसुद्धा स्वतःहून माज्याबाबत कधी जास्त व्यक्त देखील झालो नाही. ते नेहमी मला उद्योगा क्षेत्र, त्यातील आव्हाने, त्रुटी, समस्या, आर्थिक व्यवस्थापन आणि बारकावे बाबत माहिती देत असतात. नेहमीच्या कामाव्यतिरिक्त ते कधी कधी कौटुंबिक गप्पा सुद्धा मारत असतात. एक दिवस मला त्यांचा कॉल आला की आपल्याला सर्व Clients, Vendors, Supplier यांना नवीन वर्षाच्या डायरी द्यायच्या आहे. मी तुला नावाची यादी पाठवली आहे, मला फक्त स्टिकरच्या format मध्ये बसवून दे. त्यांनी सांगितल्या प्रमाणे मी सर्व व्यवस्थित बनवून दिलं. काही दिवसांनी परत त्यांचा रात्री उशिरा कॉल आला की मेल...

मी, माझं गव्हाचं शेत आणि निवेदिताचा वाढदिवस

Image
तब्बल आठ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे २३ डिसेंबर २०१० रोजी मी माज्या आजोळगावी केंदूरला आमच्या शेतात गव्हाच्या पिकाला पाणी भरत होतो. सकाळचे ११ वाजले होते. अचानक निवेदिताचा मला कॉल आला आणि माज्यावर ती रागावली,"माझा आज वाढदिवस आहे आणि ठरल्याप्रमाणे सर्वजण केक कापण्यासाठी उपस्थित आहेत. फक्त तू नाही आलास." मी सांगितलं की शेतात आहे, गव्हाला पाणी देतोय त्यामुळे येऊ शकलो नाही. मी गेलो नाही म्हणून निवेदिता कॉलवर रडत होती. तिचं रडणं ऐकून मला अगदी अवघडल्यासारखे झाले. मी खूप मोठी चूक केल्यासारखं वाटू लागलं. त्या क्षणी माझा अवतार असा होता की चिखलाने माखलेले कपडे आणि हातात फावडे घेऊन पाण्यात उभा राहून कॉलवर बोलत असलेला मी  हातातले काम सोडून मी जाऊ सुद्धा शकत नव्हतो. कारण शेतीसाठी आठवड्यातून फक्त दोन दिवस वीजपुरवठा व्हायचा. त्या दिवशी जर पाणी दिलं नाही तर मला एक आठवडा थांबावं लागलं असतं किंवा मला मध्यरात्री कडाक्याच्या थंडीत जागून पाणी द्यावं लागलं असतं आणि पिकाचं सुद्धा मोठं नुकसान झालं असतं. लगेचच तिने मला कॉलवर धमकीवजा इशारा दिला की,"तू एक तासात इथे पोहोच, त्याश...

गायत्री

Image
पु ल देशपांडे यांच्या रावसाहेब पुस्तकातील हा समास मला नेहमीच आवडतो, "एखाद्या माणसाची आणि आपली wavelength का जमावी आणि एखाद्याची का जमू नये ह्याला काही उत्तर नाही. १५-१५, २०-२० वर्षाच्या परिचयाची माणसे असतात पण शिष्टाचाराची घडी थोडीशी मोडण्यापलिकडे त्यांचा आपला कधी संबंध जात नाही. त्यांच्या घरी जाण होत भेटणं बोलणं होत. पण भेटी झाल्या तरी मनाच्या गाठी पडत नाहीत. आणि काही माणसं अगदी क्षणभरात जन्म जन्मांतरीच नातं असल्याप्रमाणे दुवा साधून जातात. वागण्यातला बेतशुद्धपणा क्षणार्धात नष्ट होतो. तिथे स्थलभिन्नत्व आड येत नाही, पूर्वसंस्कार, भाषा, चवी आवडी निवडी कशाचाही आधार लागत नाही. सूत जमून जातं आणि गाठी पक्क्या बसतात." आज गायत्रीचा ऑफिसमधील एक सहकारी म्हणून शेवटचा दिवस त्यामुळे वाईट तर वाटणारच. ऑफिसमध्ये पोहोचल्यापासून ते ऑफिसच्या बाहेर पडेपर्यंत माज्या तोंडून फक्त दोन व्यक्तींच्या नावांचा सर्वात जास्त जप केला जातो त्या दोन व्यक्ती म्हणजे गायत्री आणि ओंकार. या दोघांमुळे मला कधी कामात कोणती अडचण जाणवली नाही. गायत्री अशी आरोळी ठोकली की पुढच्याचं क्षणी ती माज्या बाजूला येऊन उभी दिसणा...

सुरेशचंद्र म्हात्रे सर

Image
२३ सप्टेंबर, म्हात्रे सरांचा जन्म वाढदिवस. म्हात्रे सरांना शुभेच्छा नेमक्या कशा स्वरूपात द्याव्यात हाच माज्यापुढे पडलेला प्रश्न आहे कारण मला त्यांची आदरयुक्त अपार भीती वाटते. सरांसोबत संवाद साधताना आपण प्रत्यक्ष ग्रंथालयासोबत चर्चा करत असल्याची अनुभूती आल्याशिवाय राहत नाही. माझा मामेभाऊ महेश आणि मी सर्वप्रथम अंगारमळ्यात ३ सप्टेंबर २०१७ रोजी गेलो होतो. प्रशिक्षण शिबिरात फेरफटका मारत असताना म्हात्रे सरांसोबत भेट झाली त्यांनी आमची प्रेमाने चौकशी केली आणि संवाद  साधताना मी  सहजपणे बोलण्याच्या ओघात मी एका व्यक्तीचं नाव घेऊन विचारलं की यांनी संघटना का सोडली? त्यानंतर सरांची मुद्रा अचानक बदलली आणि मला उत्तरले की हा प्रश्न तू त्या व्यक्तीला जाऊन विचारला पाहिजे. या प्रश्नाचं उत्तर मी कसा देऊ शकतो? मग मी अचानक भानावर आलो की मी किती उथळ प्रश्न विचारला आणि मला पूर्ण  दिवसभर चुकल्या सारखं वाटू लागलं. दुसऱ्या दिवशी सर व्याख्यानमालेत भेटले आणि पुन्हा त्यांनी आमची आपुलकीने चौकशी केली. तेव्हा मात्र मनावरील साचलेलं भीतीचं मळभ नकळत हलकं झालं. म्हात्रे सरांचं स...

तुमचे धोरण, हेच आमचे मरण...

१९८६ साली यवतमाळच्या चिलगव्हाण येथील साहेबराव करपे नावाच्या शेतकऱ्याने सहकुटुंब आत्महत्येचं पाऊल उचललं आणि संपूर्ण देश "हादरून गेला" असं प्रसार माध्यमे म्हणतात! भारत देश स्वतंत्र झाल्या नंतर शेतकऱ्यांचे प्रश्न समाजासमोर यायला ३९ वर्षानंतर एका कुटुंबाचा अंत पाहावा लागत असेल तर ही देशासाठी नक्कीच लांच्छनास्पद गोष्ट आहे. आत्महत्येसारखे भीषण प्रकार वारंवार घडूनही शासन व्यवस्था काही केल्या जाग्या व्हायला तयार नाहीत. याउलट १९९० नंतर म्हणजेच विशेषतः जागतिक उदारीकरण अवलंबिले गेल्यानंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्येत वाढ झाली तसेच शेतकरी दारूच्या व्यसनासाठी आणि मुलांच्या लग्नकार्यासाठी कर्जबाजारी बनतो अशा प्रकारच्या खोट्या आवई सुद्धा काही लबाड लोकांनी प्रसारमध्यमातील संपादकीय रकाने भरवून केली. इंडिया आणि भारत या दोन समाजव्यवस्था दुरावण्यासाठी इथूनच सुरुवात झाली. इंडियाने शोषकाचा अवतार धारण केला आणि भारत मात्र शोषित बनून आजन्म पिचत राहिला. आमचं मायबाप असलेलं शासन आम्हाला का पोसत नाही? प्रत्येकवेळी सावत्रपणाने का वागवत आहे? हा प्रत्येक शेतकऱ्याला पडलेला यक्ष प्रश्न आहे. देशाला स्वातंत्र्य...

अजूनही क्रांतिसूर्य महात्मा फुलेंचे विचार उमजले नाहीत का...?

आज महात्मा ज्योतीराव फुले यांची जयंती. महात्मा फुले नाव ऐकलं की आपल्या डोळ्यासमोर फक्त त्यांनी बहुजनांसाठी खुली केलेली विहीर आणि स्त्री शिक्षणासाठी घेतलेला पुढाकार इतक्याच गोष्टी आठवतात आणि महात्मा फुले यांची उपलब्ध छायाचित्र दाखवून दरिद्री प्रतिमा नेहमी समोर आणली जाते. पण खरंच महात्मा फुले यांचे कार्य बहुजन सुधारणे इतपत मर्यादित होते का? तर अजिबात नाही. शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेले ज्योतीराव यांनी मोठ्या कष्टाने वडिलांना मदत करून स्वतःचे शिक्षण पूर्ण केले व समाजातील अनिष्ठ प्रथा विरोधात आवाज उठवला. इतकेच नव्हे तर त्यांनी उच्च शिक्षणाद्वारे एक यशस्वी व्यावसायिक बनले. व्यवसाय करत असताना त्यांचा देशी विदेशी लोकांसोबत संबंध आला आणि त्यातून भारतीय व पाश्चिमात्य संस्कृतीचा अभ्यास करून त्यांनी भारतीय समाजातील चुकीच्या प्रथांचे उच्चाटन करण्याचे ठरविले. या कामी त्यांना तत्कालीन कर्मठ लोकांनी प्रखर विरोध केला परंतु या विरोधाला ना जुमानता त्यांना समाजातील विविध स्तरातील अनेक जाती धर्माच्या लोकांनी सहकार्य केले म्हणून आज आपण एक पुरोगामी राष्ट्राचे नागरिक म्हणून अभिमानाने पाठ थोपटून घेऊ शकतो. न...

अर्धवट ज्ञान हीच अर्धवट दरिद्री!

काही दिवसांपूर्वी म्हणजेच ७ ऑक्टोबर २०१७ रोजी आळंदीला जाण्याचा योग आला होता. नेहमीच्याच सवयीप्रमाणे संत ज्ञानेश्वर महाराजांच दर्शन झाल्यावर पुस्तकांच्या दुकानात रमून गेलो. तिथे मला दीपकने सुचविलेले १९३१ साली प्रकाशित ह. भ. प. निवृत्ती वक्ते महाराज लिखित श्री मुक्ताबाई चरित्र मिळालं. त्या ग्रंथाच्या चटकन दोन प्रत विकत घेऊन त्यातील एक प्रत मी दीपकला त्याच्या घरी नेऊन दिली आणि त्याच्याकडून माघारी येताना वाघोलीला नेहमीच्या शिरस्त्या प्रमाणे वाघेश्वराचं दर्शन घ्यायला निघालो असता पावसाने हजेरी लावलीच! कसाबसा मंदिराच्या बाहेर चपला काढून गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेऊन मी सभामंडपात स्थिरावलो. परतीचा पाऊस इतका प्रचंड होता की तो इतक्यात काही थांबण्याची चिन्हे दिसत नव्हती. तेवढ्यात माज्या ध्यानात आलं की माज्या जवळ ग्रंथ आहे वाचायला, मग काय झालंच! माझी तिथेच वाचनाची बैठक सुरू झाली. सर्व काही भान विसरून मी ग्रंथ वाचण्यातच मग्न झालो. काही वेळाने पावसाच्या सरींचा आवाज कमी झाला म्हणून सहज घड्याळात पाहिलं तर रात्रीचे १० वाजले होते म्हणजे मी सलग तीन तास मंदिरात ग्रंथ वाचत होतो आणि एवढा वेळ देऊन सुद्धा माझं...